Posts

Showing posts from January, 2021

अबोल प्रेमाची बोलकी गोष्ट 😊

काय रे अभिषेक अजून किती वेळ लावणार आहेस तू? लवकर ये ना आता. केव्हा पासून वाट बघतेय मी? तरी मी म्हणतच होते की गोव्याला तु एकटाच जाऊन ये. तु तुझ्या कामात व्यस्त असतो आणि इथे हॉटेल मध्ये एकटं राहून मला कंटाळा येतो. आता लगेच ये. सवानी ने हसतच फोन ठेवला.  सवानी आणि अभिषेक हे तसे बालपणाचे मित्र. लहानपणापासून ते सातत्याने सोबतच राहायचे. दोघेही तसे अबोल, शांत, मृदु स्वभावी, निर्व्यसनी आणि जिवाला जीव लावणारे. बालपण मागे पडत गेल आणि तरूणाई चे दिवस उजाडले. सवानी च्या वडिलांनी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. पण तिला समजवून घेणारा, तिच्याशी न बोलता सुध्दा संवाद साधणार जोड़ीदार सापडेना. वर्ष उलटून गेलं. एका संध्याकाळी अभिषेक च्या आई ने सवानी ला घरी बोलावून घेतल. अभिषेक सुद्धा तिथे बसला होता. चहा झाला आणि डोळ्याची पापणी न हलवता अभिषेक च्या आई ने सवानी ला एक प्रश्न विचारला. अभिषेक सोबत लग्न करणार? सवानी ने अभिषेक कडे बघितलं. अभिषेक ने एक सौम्य हास्य दिलं आणि होकाराने मान डोलावली. सवानी करता इतकंच पर्याप्त होत. तिने अभिषेक च्या आईला लाजत होकार दिला. पुढल्या ६ महिन्यात थाटामाटात लग्न सुद्धा झालं. अभिषेक ...

लाल परी

आयुष्यात खुप गोष्टी सतत घडत असतात. त्यातील काही तुमच्या मनावर एक ठसा सोडुन जातात. ही गोष्ट आहे हरिहरेश्वर ची. पहाटेची वेळ. २०२१ ने दिवसा पूर्वीच पदार्पण केले होते. २०२० ने दिलेलं दडपण सागरात वाहून देण्यास जणू मानवतेची एक छोटी नदी त्या समुद्रात विलीन होण्या करताच आली असावी. उत्साही मंडळी छायांकन करण्यात व्यसत होती. लोक मनमोकळे होऊन पाण्यात खेळत होते. तरुण जोडपे, आजी-आजोबा, लहान मुलं सगळे कशे आनंदी होते. मी मात्र निसर्गा मध्ये रमलो होतो. तेवढ्यात एक लहान मुलगा माझ्या समोरून अश्वा सारखा पळत गेला. क्षितिजा वर असलेली माझी नजर विसकूटली आणि त्या लहान मुलाचा पाठलाग मी डोळ्यानेच करू लागलो. लोकांच्या गर्दीत तो भरधाव वेगाने पळतच होता. तेवढयात एका लाल ड्रेस घातलेल्या मुली कडे माझं लक्ष गेलं. चेहऱ्यावर एक तेजोमय मृदु हास्य, खाऱ्या वाऱ्यात भुरभुरणारे तिचे कुरळे केस, कानात सुंदर नाजूक कुंडल बघून मन प्रफुल्लित झालं. रेतीत पडलेले शंख-शिंपली कदाचित तिला खूप आवडतं असावे कारण सतत त्याचं छायांकन ती करत होती. त्या शंख शिंपल्यांचे सौन्दर्य ती तिच्या मोबाईल मध्ये उतरवून घेत होती. माझं संपूर्ण लक्ष त्या मुलीवर...