लाल परी

आयुष्यात खुप गोष्टी सतत घडत असतात. त्यातील काही तुमच्या मनावर एक ठसा सोडुन जातात. ही गोष्ट आहे हरिहरेश्वर ची. पहाटेची वेळ. २०२१ ने दिवसा पूर्वीच पदार्पण केले होते. २०२० ने दिलेलं दडपण सागरात वाहून देण्यास जणू मानवतेची एक छोटी नदी त्या समुद्रात विलीन होण्या करताच आली असावी. उत्साही मंडळी छायांकन करण्यात व्यसत होती. लोक मनमोकळे होऊन पाण्यात खेळत होते. तरुण जोडपे, आजी-आजोबा, लहान मुलं सगळे कशे आनंदी होते. मी मात्र निसर्गा मध्ये रमलो होतो. तेवढ्यात एक लहान मुलगा माझ्या समोरून अश्वा सारखा पळत गेला. क्षितिजा वर असलेली माझी नजर विसकूटली आणि त्या लहान मुलाचा पाठलाग मी डोळ्यानेच करू लागलो. लोकांच्या गर्दीत तो भरधाव वेगाने पळतच होता. तेवढयात एका लाल ड्रेस घातलेल्या मुली कडे माझं लक्ष गेलं. चेहऱ्यावर एक तेजोमय मृदु हास्य, खाऱ्या वाऱ्यात भुरभुरणारे तिचे कुरळे केस, कानात सुंदर नाजूक कुंडल बघून मन प्रफुल्लित झालं. रेतीत पडलेले शंख-शिंपली कदाचित तिला खूप आवडतं असावे कारण सतत त्याचं छायांकन ती करत होती. त्या शंख शिंपल्यांचे सौन्दर्य ती तिच्या मोबाईल मध्ये उतरवून घेत होती. माझं संपूर्ण लक्ष त्या मुलीवरच केंद्रित होत. तिला त्या सागर वाळूत हृदयाच्या आकाराचं एक पान दिसलं. एकटक ती त्याच पाना कडे बघत होती. त्यात कदाचित ती कुणाला तरी शोधत असावी. त्या पाना सोबत तिचं एक जवळीक नातं अगदी दोन मिनिटात जुळलं. तो धावणारा लहान मुलगा सुद्धा लांबून हे सगळं बघत होता. कुतूहलाने तो त्या मुली जवळ आला आणि पाना कडे बघुन लगेच खाली वाकला. त्याला ते पान हवं होतं; पण त्या मुलीने अलगद त्याचा हात धरून थांबायला सांगितलं. पान स्वतः उचललं आणि रुमालाने पुसून तिच्या पिशवीतील दैनंकीका मध्ये ठेवलं. समुद्र काठचा वारा थोडा तीव्र झाला आणि तेव्हाच ती परत शिंपी बघत चालू लागली. तिचा तो लांब लाल ड्रेस सुद्धा तिच्या कुरळ्या केसां सारखा झुरझुर उडत होता. मी लांबुन हे सगळं बघत होतो. आपल्या पुढे साक्षात अप्सरा आहे असं भास घडू लागला. जाता जाता कुणास ठाऊक का, पण ती मागे वळली आणि तिची नजर माझ्यावर पडली. तिने एक स्मितहास्य दिल आणि परत मार्गी लागली. जसं त्या पाना सोबत काही मिनिटातच तिचं एक आपुलकीच नातं जुळलं होत तसंच नातं माझं त्या "लाल परी" बरोबर जुळलं होत. कुठलं नातं, कसलं नातं या प्रश्नांची उत्तरे माझ्या कडे सुद्धा नाही. लाल परी मात्र कायम स्वरूपी मनात घर करून बसली. 😊


- संयोगी



 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रेम

अबोल प्रेमाची बोलकी गोष्ट 😊