प्रेम

 प्रेम म्हणजे नक्की काय असत? 


श्रावणात समुद्र काठी कोसळणाऱ्या त्या लाटा की नदीतील तो संथ प्रवाह? सह्याद्रीतील पावसाळातील ती हिरवळ की उन्हाळ्यातील तो मावळता सूर्य? संध्याकाळच ते रेताळ वाळवंट की दुपारी जंगलातील पाखरांचा तो किलबिलाट? पौर्णिमेचा तो चंद्र की अमावास्येची ती चांदणी रात्र? तिच्या सोबत स्थापित केलेलं ते आयुष्य की तिच्या विरहात नकळत ओले होणारे ते डोळे?


प्रत्येकाला प्रेम कळतं पण प्रत्येकाची प्रेमाकडे बघायची दृष्टी वेगळी असते. थोडक्यात सांगायचं तर प्रेमाला कुठलीच परिभाषा नसते, प्रेमाला कुठलेच बंधनं नसतात, प्रेमाला कुठलेच नियम नसतात. प्रेम फक्त समजायचं नसत; तर ते अनुभवायचं सुद्धा असतं. 😊


माणूस नकळत प्रेमात पडतो पण खूप कमी लोकांना ते प्रेम आयुष्यभर जोपासून ठेवता येत. तूर्तास एवढंच.... 

Comments

Popular posts from this blog

लाल परी

अबोल प्रेमाची बोलकी गोष्ट 😊