आठवणी
आपल्या गतिमान आयुष्यात सातत्याने लोकांची गर्दी असते. त्यातले काही लोक खूप छान मित्र होतात तर काहीं लोक आपल्या जीवनात अदृश्य होऊन आपल्याला प्रेरणा देत असतात. काही लोकांना आपण शत्रू म्हणून गृहीत धरतो, तर काही लोकांना आपण जवळ करून घेतो. काही लोक आपल्या जीवन काळात खूप कमी वेळ असतात; मात्र एक मधुर स्मृती सोडून जातात. आजू बाजूची गर्दी ओसरली की आठवण येते ती याच लोकांची; कारण या लोकांनी कुठलाही विचार न करता तुमच्यावर जीव ओवाळलेला असतो, तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम केलेलं असतं. अशी लोक जो पर्यंत आयुष्यात असतात तो पर्यंत आपण त्यांच्या चांगुलपणा कडे दुर्लक्ष करतो, त्यांना गृहीत धरतो. परिणामस्वरूप ती लोक तुमच्या आयुष्यातून काढता पाय घेतात. ती तुमच्या सोबत भांडत नाही, वाद घालत नाही, निघून जाताना तुमच्या सोबत कुठलाही संवाद साधत नाही. पुढे आयुष्यात एखादा कठीण प्रसंग आला की तुम्हाला हीच लोक आठवतात पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. तुमच्या अश्रूंचा बांधारा असणारे मित्र आता तुमच्या सोबत नसतात. तुम्हाला सावरून घेणारी ती व्यक्ती आता तुमच्या सोबत नसते. असतात त्या फक्त आठवणी. 😊🙏